दैनिक स्थैर्य । दि. ०१ सप्टेंबर २०२२ । मुंबई । आपली आर्थिक साक्षरता वाढवण्याकडे भारतीय किशोरवयीन मुला-मुलींचा कल असल्याचे भारतातील किशोरवयीन केंद्रीत पॉकेट मनी अॅप मुविन (muvin) आणि मॉम्सप्रेसो.कॉमने एकत्रितपणे केलेल्या ग्राहक सर्वेक्षणातून निदर्शनास आले होते. यातून बोध घेत मुविन भारतातील विद्यार्थ्यांची सर्वात मनी ऑलिम्पियाड, फिनमॅनिया (FINMANIA) याचे आयोजन करत आहे. मुंबई, पुणे, दिल्ली एनसीआर, बंगळुरू, हैदराबाद आणि चेन्नईतील २००+ पेक्षा जास्त शाळांत फिनामिनियाचे आयोजन केले जात आहे. यासोबतच देशभरातील विद्यार्थ्यांना ऑनलाइन सहभागासाठी ही स्पर्धा खुली ठेवण्यात आली आहे. स्पर्धेची पात्रता फेरी आगामी सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस सहभागी होणाऱ्या शाळेत आॅफलाइन पद्धतीने घेतली जाणार आहे.
ऑनलाइन पात्रता फेरी २९ सप्टेंबर आणि १ ऑक्टोबरदरम्यान घेतली जाणार आहे. सर्वोत्तम स्पर्धकांची विभागीय पातळीसाठी निवड केली जाईल. त्यांच्यातून ऑक्टोबर २०२२ मध्ये होणाऱ्या अखिल भारतीय अंतिम फेरीतील स्पर्धक निवडले जातील. या स्पर्धेत १,००,००० पेक्षा जास्त जास्त विद्यार्थी सहभागी होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. स्पर्धेत बक्षीसांची एकूण रक्कम १० लाख रुपयांपर्यंत आहे. यामुळे फिनमॅनिया ही विद्यार्थ्यांसाठी भारतातील सर्वात मोठी मनी ऑलिम्पियाड ठरली आहे.