
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
दैनिक स्थैर्य । दि.३१ मार्च २०२२ । सातारा । सातारा तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला. ही घटना २८ मार्च रोजी घडली. याप्रकरणी राजेश रमेश घोरपडे रा. गोजेगाव, ता. सातारा याच्याविरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि.२८ मार्च रोजी दोन वाजण्याच्या सुमारास सातारा तालुक्यातील एका गावातील समाज मंदिराशेजारी अल्पवयीन मुलगी गावातील हातपंपावर पाणी भरण्यासाठी गेली होती. त्यावेळी राजेश घोरपडे याने तिचा पाठलाग करून तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केले. या घटनेनंतर संबंधित मुलीच्या आईने त्याच्या विरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर राजेश घोरपडे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.
