घराच्या खिडकीतून मोबाईल चोरीस


 

स्थैर्य, सातारा, दि. 10 : येथील गोळीबार मैदानजवळ एका घराच्या खिडकीतून चोरट्याने मोबाईल लंपास केला. याबाबत ज्ञानेश्‍वर रामचंद्र ढमाळ यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, गोळीबार मैदान, सातारा येथील व्यंकटेश हौसिंग सोसायटीत त्यांचे घर आहे. त्याठिकाणी त्यांच्या घराच्या खिडकीतून चोरट्याने रेडमी कंपनीचा सहा हजारांचा मोबाईल चोरट्याने लंपास केला. याप्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोद झाला असून पोलीस तपास करत आहेत.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!