
स्थैर्य, फलटण दि.25 : चाकूचा धाक दाखवून मोबाईल लंपास केल्याची घटना फलटण शहरात घडली आहे.
याबाबत फलटण पोलीस स्टेशनकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी रमेश रामचंद्र शिंदे वय 43, राहणार बिरदेव नगर, जाधववाडी, तालुका फलटण मूळ राहणार मायनी तालुका, माण हे दि.16 जानेवारी रोजी रात्री 8:15 च्या सुमारास फलटण येथील सोमवार पेठ, पेट्रोल पंपाच्या पाठीमागे येथे बारामतीवरुन येत असताना टीव्हीएस स्टाय सिटी मोटारसायकलवरुन एक वय अंदाजे 19 ते 20 वयोगटातील अनोळखी मुलगा आला. त्यांने तोंडाला मास्क व चेहर्याला स्कार्प बांधलेला व उजव्या हातावर तुषार हे नाव इंग्रजीत गोंदलेले होते. सदर मुलाने आपल्याकडील चाकूचा धाक दाखवून फिर्यादीकडील रुपये 10 हजार किंमतीचा पर्पल रंगाचा विवो कंपनीचा मोबाईल जबरदस्तीने चोरुन नेला.
दरम्यान, सदर फिर्यादीनुसार पोलीसांनी तुषार उर्फ गद्या संजय ननावरे, राहणार आखरी रस्ता, मंगळवार पेठ, फलटण याला अटक करुन त्यांच्याकडून सदरचा मोबाईल हस्तगत केला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गायकवाड हे करीत आहेत.