
स्थैर्य, सातारा, दि. 24 : सातारच्या शाहुनगर परिसरातील अजिंक्य बाजार चौक ते अमराई बंगला, रामराव पवार नगर दरम्यानच्या सुरू असलेल्या रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम निकृष्ट दर्जाची होत आहे. कामे कशा पध्दतीने सुरु आहेत, हे अधिकाऱयांना प्रत्यक्ष निदर्शनास आणून मनसेचे शहराध्यक्ष राहुल पवार आणि मनसैनिकांनी पोलखोल केला. त्यानंतर तत्काळ शाखा अभियंत्यांनी हे काम थांबविण्याच्या सूचना संबंधित ठेकेदारास दिल्या.
बांधकाम विभागाकडून शाहुचौक ते अमराई बंगला या रस्त्याचे काम सुरू आहे. मात्र अधिकारी प्रत्यक्ष भेट देत नसल्याने ठेकेदाराने काम उरकले आहे. हेच काम अत्यंत निकृष्ट असल्याचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सातारा शहर अध्यक्ष राहूल पवार यांनी बांधकाम विभागाच्या अधिकायांना जागेवर बोलवून निदर्शनास आणून दिले. यावेळी अधिकायांना ही तत्थ समजल्यावर ठेकेदाराला काम थांबविण्यास सांगितले.”सदरच्या कामाची क्वालिटी कंट्रोल कमिटीतर्फे तपासणी करावी,”अशी मागणी करून याबाबत कार्यकारी अभियंता यांच्या दालनात मंगळवारी बैठक घेण्याची मागणीही मनसेतर्फे करण्यात आली आहे.सातायात शाहूनगर येथे अजिंक्य बाजार चौक ते अमराई बंगल्या दरम्यान साधारण एक किलोमीटर अंतराच्या रस्त्याची डांबरीकरण सध्या सुरू आहे. मुळातच हा भाग त्रिशंकू कार्यक्षेत्र असल्याने तेथे विकासकामांना मर्यादा आहे.त्रिशंकू भाग असल्याने प्रशासनाचे या भागाकडे दुर्लक्ष होत आहे.मात्र जिल्हा परिषद बांधकाम उत्तर विभागाकडून सध्या या रस्त्याचे डांबरीकरण हाती घेण्यात आले आहे.
मात्र हे काम अत्यंत निकृष्ट होत असून रस्ता बांधकामाच्या आदर्श नियमावलीचे कोणतीही पालन करण्यात आलेले नाही. प्रत्यक्ष रस्त्याच्या कामाची शाखा अभियंता गाढवे आणि त्यांच्या पथकाने पाहणी केली.यावेळी बांधकाम विभागाचे अधिकारी, संबंधित ठेकेदार, मनसेचे राहुल पवार, भरत रावळ, अजहर शेख, वैभव वेळापुरे, सागर पवार, गणेश पवार आदी उपस्थित होते.