आमदार सुशील मोदींविषयी सल्ला देण्यासाठी बसून राहिले, पण संरक्षण मंत्री पाटण्यात जाऊनही त्यांना भेटण्यास गेले नाहीत

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

 

स्थैर्य, दि १५: बिहारमध्ये भाजप जनतेचे मन ओळखण्यात यशस्वी ठरली, पण आता पक्षामध्ये गटबाजी असल्याचे वृत्त आहे. गेल्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री राहिलेले सुशील कुमार मोदींच्या नावावर पक्षाच्या आमदारांचे एकमत नाही. मते जाणून घेतल्यानंतर गटबाजी उघड होऊ नये, याच कारणामुळे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह रविवारी पाटणामध्ये पोहोचून पक्षाच्या आमदारांना भेटले नाहीत.

पार्टीच्या सूत्रांनी सांगितले की, बिहारच्या विजयी आमदारांकडून चिठ्ठीच्या माध्यमातून मत घेतले जाते. यावेळी अनेक आमदारांनी सुशील कुमार मोदींचा विरोध केला असता. शनिवारी संध्याकाळपासून याविषयी प्रदेश भाजपमध्ये गटबाजी असल्याची चर्चा होती.

राजनाथ सिंह पक्षाच्या कार्यालयात पोहोचले नाहीत

आमदारांना सांगितले गेले होते की, राजनाथ सिंह सकाळी 10 वाजेपासून बैठकीत पोहोचतील. यानंतर साडे 11 वाजेची वेळ देण्यात आली. 11.40 ला राजनाथ पाटणामध्ये पोहोचले होते. मात्र ते मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी गेले. यानंतर राजनाथ स्टेट गेस्ट हाउसमध्ये गेले. यानंतर साडेबारा वाजता थेट NDA च्या बैठकीत सामिल झाले.

20 मिनिटांमध्ये घेता येऊ शकले असते मतं

पाटणा एअरपोर्टवरुन भाजप कार्यालयाचे अंतर केवळ 5 मिनिटांचे आहे. आपला सल्ला देण्यासाठी पोहोचलेल्या आमदारांनी सांगितले की, राजनाथ सिंह येथे 12 वारा वाजताही आले असते तर 20 मिनिटांमध्ये जिंकलेल्या आमदारांची मते जाऊन घेऊ शकले असते. मात्र त्यांनी असे केले नाही.

आमदारांनी बदलाची मागणी केली

आमदारांसोबत बातचित केल्यानंतर त्यांनी सुशील कुमार मोदींचे नाव घेतले नाही. पण नेतृत्त्वात बदल आणि नितीश यांच्या छायेतून निघण्याविषयी सांगितले. अनेक आमदारांनी बदल व्हायला हवा अशी मागणी केली. तिकडे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, NDA ची बैठक जास्त महत्वपूर्ण होती. यामुळे कार्यक्रमामध्ये बदल झाला.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!