
फलटण-कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार सचिन पाटील यांनी फलटण येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त शिवरायांना विनम्र अभिवादन केले. यावेळी ज्येष्ठ नेते भीमदेव बुरुंगले, गणेश शिरतोडे यांच्यासह अनेक शिवप्रेमी उपस्थित होते.
स्थैर्य, फलटण, दि. 20 एप्रिल : स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त फलटण शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, सर्वत्र मोठ्या उत्साहाचे आणि शिवमय वातावरण पाहायला मिळत आहे. या मंगलमय प्रसंगी फलटण-कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार सचिन पाटील यांनी फलटण येथे उपस्थित राहून छत्रपती शिवाजी महाराज यांना विनम्र अभिवादन केले.
या अभिवादन सोहळ्याप्रसंगी आमदार सचिन पाटील यांच्यासोबत परिसरातील अनेक राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर आणि शिवप्रेमींची प्रमुख उपस्थिती होती. यामध्ये प्रामुख्याने ज्येष्ठ नेते भीमदेव बुरुंगले आणि ‘छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समिती’चे अध्यक्ष गणेश शिरतोडे यांनीही उपस्थित राहून शिवरायांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करत त्यांना मानाचा मुजरा केला.
यावेळी त्यांच्यासह शिवजयंती उत्सव समितीचे इतर सर्व पदाधिकारी, विविध संस्थांचे प्रतिनिधी, कार्यकर्ते आणि शिवप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’, ‘जय भवानी, जय शिवाजी’ अशा जयघोषांनी यावेळी संपूर्ण परिसर दणाणून गेला होता.
