स्व. यशवंतराव चव्हाण यांना ना. अजितदादांच्यासोबत आमदार सचिन पाटील यांनी वाहली आदरांजली


दैनिक स्थैर्य | दि. २५ नोव्हेंबर २०२४ | फलटण | कराड येथे प्रितीसंगम बागेत आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार, राज्याचे पहिले मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण साहेब यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या समाधीस्थळाचे दर्शन राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष ना. अजितदादा पवार यांच्यासोबत फलटणचे नवनिर्वाचित आमदार सचिन पाटील यांनी पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहिली आहे.

ज्यांच्या विचारधारा आणि आदर्शांवर आम्ही लोकसेवेचा वारसा पुढे नेत आहोत, त्या चव्हाण साहेबांच्या दूरदृष्टीतील समृद्ध महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी लोकसेवेच्या माध्यमातून योगदान देण्याचा दृढ संकल्प केला असल्याचे मत यावेळी ना. अजितदादा पवार यांनी व्यक्त केले.

यावेळी आमदार हसन मुश्रीफ, आमदार मकरंद पाटील, जिल्हा बँकेचे संचालक श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर यांच्यासह अनेक मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.


Back to top button
Don`t copy text!