दैनिक स्थैर्य | दि. १० डिसेंबर २०२४ | मुंबई | फलटण – कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार सचिन पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची विशेष अधिवेशनादरम्यान भेट घेऊन फलटण बसस्थानकाच्या मूलभूत सुविधांत सुधारणा, प्रवाशांच्या सुविधांसाठी व आवश्यक उपाययोजनांबाबत सविस्तर चर्चा केली.
आमदार पाटील यांनी फलटण शहर हे औद्योगिक, सांस्कृतिक, आणि आर्थिकदृष्ट्या महत्त्वाचे केंद्र असून येथे आधुनिक सुविधा उपलब्ध होण्यासाठी प्रशासनाच्या पाठिंब्याची मागणी केली.
माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे स्वप्न प्रत्यक्षात लवकरच साकार होणार असून याबाबत माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी खासदार असताना सतत पाठपुरावा करून फलटणच्या शिरपेचात एक नवीन मानाचा तुरा रोवला आहे.
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी या विषयावर सकारात्मक प्रतिसाद देत लवकरच आवश्यक त्या सुधारणा करण्याचे आश्वासन आमदार पाटील यांना दिले आहे.
फलटण शहराच्या विकासासाठी हा एक मोठा टप्पा ठरणार असून, नागरिकांची अनेक वर्षांची मागणी पूर्ण होण्यासाठीचा हा प्रयत्न आहे, असे मत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी यावेळी व्यक्त केले, अशी माहिती फलटण-कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार सचिन पाटील यांनी दिली.