स्थैर्य, फलटण दि.२९: कोरोना काळात काम केलेया कंत्राटी कर्मचार्यांना अंशकालीन घोषित करुन कायम सेवेत सामावून घ्यावे अथवा त्यांच्यासाठी 50% जागा आरक्षित ठेवाव्यात या मागणीसंबंधीचे शिफारसपत्र फलटण कोरेगाव विधानसभा मतदार संघाचे आमदार दीपक चव्हाण यांनी राज्याचे मुख्यमंत्री ना.उद्धव ठाकरे यांना दिले.
प्रारंभी कोरोना काळात फलटण तालुक्यात काम केलेल्या कंत्राटी कर्मचार्यांनी आपल्या मागणीचे निवेदन महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती ना.श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर व आमदार दीपक चव्हाण यांना दिले. यावेळी रणजीत निंबाळकर, सोहेल पठाण, किशोर गुघे, स्वाती पवार, गौरी भोसले, शीतल पिसाळ आदी कर्मचारी उपस्थित होते.
सदर मागण्यांबाबत उपस्थित कर्मचार्यांसमवेत सविस्तर चर्चा करुन आमदार दीपक चव्हाण यांनी आपले शिफारस पत्र मुख्यमंत्र्यांकडे रवाना केले आहे.