
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
दैनिक स्थैर्य । दि. २२ नोव्हेंबर २०२२ । कराड । कराड तालुक्यात अल्पवयीन मुलीच्या अज्ञान पणाचा फायदा घेत लग्नाचे आमिष दाखवून एकाने तिच्यावर अत्याचार केल्याची तक्रार कराड शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सुमारे पाच महिन्यापूर्वी कराड तालुक्यातील एका गावात सिद्धराम हिरगप्पा वजंत्री, रा. आगाशिवनगर, ता. कराड याने एका अल्पवयीन मुलीच्या अज्ञानपणाचा फायदा घेऊन, तिला लग्नाचे आमिष दाखवत तिच्यावर अत्याचार केल्यामुळे ती दोन महिन्यांची गरोदर राहिली. याबाबत पिडीत अल्पवयीन युवतीने कराड शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
