महिला व बालविकासमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली अंगणवाडी कर्मचारी कृती समितीची बैठक

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

दैनिक स्थैर्य । दि. २९ डिसेंबर २०२१ । मुंबई । अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या शिष्टमंडळासोबत महिला व बालविकासमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक झाली. बैठकीत अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांबाबत चर्चा करण्यात आली.

राज्यातील अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना पेन्शन योजना लागू करण्यासंदर्भात, पोषण ट्रॅकर ॲपमधील तांत्रिक दोष दूर करण्याबाबत, अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे मानधन, पेन्शन, पदोन्नती यासह अन्य मागण्यांबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली.

या बैठकीस महिला व बाल विकास विभागाच्या प्रधान सचिव आय. ए. कुंदन, उपसचिव विलास ठाकूर, एकात्मिक बाल विकास उपायुक्त गोकुळ देवरे, अंगणवाडी कर्मचारी कृती समितीचे सदस्य उपस्थित होते.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!