एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांना कोरोनाची लागण, सोशल मीडियाद्वारे दिली माहिती

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

स्थैर्य,औरंगाबाद,दि २३: राज्यभरातील कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. दरम्यान राज्यभरातील अनेक नेत्यांना कोरोनाने विळखा घातला आहे. आता मोठ्या नेत्यांमधून औरंगाबादचे एमआयएमचे पक्षा खासदार इम्तियाज जलील यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. इम्तियाज जलील यांनी सोशल मीडियावरुन ही माहिती दिली आहे.

गेल्या काही दिवसांपासून इम्तियाज जलील यांना कोरोनाची लक्षणे जाणवत होती. यामुळे त्यांनी कोरोना चाचणी करुन घेतली. यानंतर त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. रिपोर्ट आल्यानंतर जलील यांनी स्वत:ला आयसोलेट करून घेतले आहे.

दरम्यान औरंगाबादमध्येही मागील चार- पाच दिवसांपासून कोरोना रुग्णांची आकडेवारी वाढत आहे. या दरम्यानच औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनाही कोरोनाची बाधा झाली. त्यांनी सोशल मीडियावरुन याविषयी माहिती दिली. ते म्हणाले की, ‘सर्वांना माझा नमस्कार, माझा कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. तीन दिवसांपूर्वी मला कोरोनाची काही लक्षणे दिसली होती. त्यानंतर मी स्वतःला आयसोलेट केले होते. सध्या कोरोनावर उपचार घेत आहे. तुम्ही सर्वजण घरी सुरक्षित रहा’.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!