दरवाढीसाठी १ जुलैपासून ‘दूध दर दिंडी आंदोलन’

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. २८ जून २०२४ | फलटण |
महाराष्ट्रातील शेतकर्‍यांच्या दुधाला गेल्या अनेक महिन्यांपासून चांगला भाव मिळत नाही. यामुळे दुभत्या जनावरांना पाळणे अवघड झाले आहे. म्हणून शेतकर्‍यांच्या दुधाला दर मिळावा यासाठी ‘दूध दर दिंडी आंदोलन’ आयोजित केल्याची माहिती आज कोळकी येथील विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत शंभूराज खलाटे यांनी माहिती दिली.

ही ‘दूध दर दिंडी आंदोलन’ शिखर शिंगणापूर ते पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील समाधीस्थळ अशी निघणार आहे. दिंडी प्रस्थान ‘कृषीदिनी’ शिखर सिंगणापूर येथून सोमवार, दि. १ जुलै २०२४ रोजी पहाटे ठीक ५ वाजता होईल. दुपारी गोरक्षनाथ गड येथे गोरक्षनाथ मंदिर दर्शन (ता. जि. अहिल्यानगर डोंगणन), सायंकाळी मुक्काम राहुरी येथे होईल.

मंगळवार, दि. २ जुलै २०२४ रोजी सकाळी ५ वाजता राहुरी येथून दुपारी श्री. पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील यांच्या समाधीस्थळावर जाऊन बेमुदत अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात होईल.

दूध दर दिंडी आंदोलनात

  • दुधाला प्रतिलिटर हमीभाव चाळीस रुपये (४०/-) मिळावा,
  • पशुखाद्याच्या गुणवत्तेवर सरकारने नियंत्रण ठेवावे,
  • महाराष्ट्रातील भेसळयुक्त दुधाचा महापूर रोखावा अन्यथा एफडीआय खाते बंद करावे,
  • मागील अनुदान किचकट अटी नियम न घालता सरकारने सरसकट दूध उत्पादक शेतकर्‍यांना द्यावे,
  • ११ मार्च २०२४ पासून बंद झालेले अनुदान आज अखेरपर्यंत दूध उत्पादकास एकरकमी विनाअटी शर्ती द्यावे,
  • उत्तर प्रदेश राज्याच्या धरतीवर भाकड जनावरांना प्रति महिना दीड हजार रुपये (१५००/-) अनुदान द्यावे,
  • वजने मापे गुण नियंत्रक विभागाने प्रत्येक डेअरी वर दरमहा तपासणी पथके निर्माण करावी. त्या पथकामध्ये दूध उत्पादक शेतकर्‍यांचा सहभाग असावा,

अशी मागणी करण्यात येणार आहे.

या दिंडी आंदोलनात सहभागी होण्यासाठी व माहितीसाठी अशोकराव सस्ते, फलटण, आझादसिंह उर्फ शंभुराज खलाटे फलटण, पै. खंडू कर्चे, फलटण, पै. हरी पवार इंदापूर-बावडा, अक्षय तावरे, सतिश देशमुख पुणे, पै.संतोष ठोंबरे, फलटण, महेश अर्जुनराव जेधे, राजन पवार, पुरंदर, दत्तात्रय कड, पुरंदर, गोरक्षक, फलटण, पुरंदर – निरा, ब्रह्मदेवतात्या आरकीले पंढरपूर शरळ नाळे, फलटण, जोतीराव जाधव, सांगली, अ‍ॅड. चव्हाण, आष्टी यांच्याशी मोबा. ९६७३३७१४१४/९८२०४४२६८९/९१३०७५००९१ ९९७५९५३९५०/९८८१४९५५१८/ ८८३०२२००५७/ ९०२२७९१००९ यावर नंबरवर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.


Back to top button
Don`t copy text!