मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून नाताळच्या शुभेच्छा

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

दैनिक स्थैर्य । दि. २५ डिसेंबर २०२१ । मुंबई । जगाला शांती आणि प्रेमाची शिकवण देणारे प्रेषित येशू ख्रिस्त यांचा जन्मोत्सव नाताळ निमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. आनंद आणि उत्सवाचे हे पर्व साजरे करताना जगावर आलेल्या कोरोना संकटाचे भान राखावे. विषाणूचा नवा प्रकार आणि त्याचा वेगाने होणारा प्रसार रोखण्यासाठी गर्दी टाळावी. घरीच थांबून हा सण साजरा करावा तसेच कोरोना नियमांचे पालन करावे असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले आहे.

नाताळच्या पूर्वसंध्येला दिलेल्या शुभेच्छा संदेशात मुख्यमंत्री म्हणतात, येशू ख्रिस्ताने परस्परांचा आदर आणि प्रेमभाव जपण्याची शिकवण दिली आहे. कोरोनाच्या या संकट काळात तर या शिकवणीचे भान राखावे लागेल. जन्मोत्सव हा आनंद आणि उत्साहाचा क्षण जरूर आहे पण तो साजरा करताना आपल्याला परस्परांची काळजी घ्यावी लागेल. त्यासाठी उत्सव साजरा करण्याबाबत घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे लागेल. यातूनच आपल्या आप्तस्वकीयांच्या जीवनात आरोग्य आणि पर्यायाने सुख, समृद्धी आणि समाधान येणार आहे. त्यासाठी नाताळच्या या उत्सव पर्वानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!