भाजपा पदाधिकार्‍यांची विधानसभा निवडणुकीसंदर्भात बैठक संपन्न

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. ७ जुलै २०२४ | फलटण |
आगामी विधानसभा निवडणुकीसंदर्भात भारतीय जनता पार्टीची जिल्ह्यातील पदाधिकार्‍यांची महत्वपूर्ण बैठक दि. ६ जुलै २०२४ रोजी ‘हॉटेल लेक व्हिव’, सातारा येथे आयोजित करणेत आली होती.

या बैठकीला प्रदेश निरीक्षक म्हणून मा. खा. मेधाताई कुलकर्णी व जिल्हा प्रभारी सदाशिव खाडे, महामंत्री मकरंद देशपांडे, आमदार जयकुमार गोरे, जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम उपस्थित होते. यावेळी प्रदेश निरीक्षक मा. खा. मेधाताई कुलकर्णी यांचे स्वागत भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष संदीप चोरमले, फलटण तालुका (पश्चिम) अध्यक्ष अमोल सस्ते, एस. सी. जिल्हा उपाध्यक्ष संजय गायकवाड, जिल्हा पदाधिकारी राहुल शहा यांनी केले.

या बैठकीसाठी प्रदेश पदाधिकारी तसेच जिल्हा कोअर कमिट सदस्य, जिल्हा पदाधिकारी, विधानसभा निवडणूक प्रमुख, जिल्हा सरचिटणीस, जिल्हा बूथ रचना कार्ययोजना संयोजक, सहसंयोजक, मंडल अध्यक्ष व सरचिटणीस, मंडल बूथ रचना कार्ययोजना संयोजक, सहसंयोजक, मोर्चे, आघाड्या जिल्हाध्यक्ष, महिला मोर्चा मंडल अध्यक्ष, युवा मोर्चा मंडल अध्यक्ष उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!