१ मे महाराष्ट्र दिन साजरा होणार अत्यंत साधेपणाने; सातारा प्रभारी जिल्हाधिकाऱ्यांची माहिती

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

स्थैर्य, सातारा, दि. ३० : महाराष्ट्र राज्य स्थापनेचा 61 वा वर्धापन दिन शनिवार दि.1 मे 2021 हा कोरोना विषाणुची साखळी तोडण्यासाठी अत्यंत साधेपणाने आयोजित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या निर्देशानुसार जिल्ह्यात, जिल्हा मुख्यालयातील फक्त जिल्हाधिकारी कार्यालयात या एकाच ठिकाणी ध्वजारोहण करावयाचे आहे. या कार्यक्रमास केवळ पालकमंत्री, नगराध्यक्ष, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद एवढ्याच पदाधिकारी, अधिकारी यांच्या उपस्थितीत होणार आहे, अशी माहिती प्रभारी जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे यांनी दिली आहे.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!