
दैनिक स्थैर्य । 26 जून 2025 । फलटण । मुंबई येथील माऊली फाउंडेशन ‘आयोजित आषाढी वारी आनंद सोहळा ’ या कार्यक्रमाचे शुक्रवार, दि. 27 जून रोजी सायंकाळी चार वाजता अनंत मंगल कार्यालय येथे आयोजन करण्यात आले आहे.
यावेळी कै. नाना वेल्हाळ स्मृती उत्कृष्ट समाजसेवक पुरस्कार ज्येष्ठ समाजसेविका श्रीमती उषाताई पोरे यांना प्रदान करण्यात येणार आहे.
तसेच यावेळी माजी प्राचार्य व व्याख्याते रवींद्र येवले यांचे ‘मला आनंदात जगायचे’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. दुपारी चार वाजता ग्रंथ दिंडी व वृक्ष दिंडी निघणार आहे.
या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजकांनी केले आहे.

