क्रांतीसुर्य प्रतिष्ठानतर्फे माऊलींच्या पालखी सोहळ्यासाठी मोफत औषधांचे वितरण

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

दैनिक स्थैर्य । 26 जून 2025 । फलटण । येथील क्रांतीसुर्य प्रतिष्ठानच्या माध्यमातून श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे औचित्य साधुन कापशी येथील लोकमान्य मेडिकल फौंडेशनला मोफत औषधांचे वितरण करण्यात आले आहे.

लोकमान्य मेडिकल फौंडेशनच्या माध्यमातून कापशी येथे श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याच्या निमित्ताने डॉ. बी. के. यादव यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. अनंत मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत मोफत औषधोपचार कॅम्प राबवला जातो. त्याचे औचित्य साधुन क्रांतीसुर्य प्रतिष्ठानच्या माध्यमातून मोफत औषधांचा पुरवठा करण्यात आला आहे.

क्रांतीसुर्य प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष मिलिंद नेवसे यांच्या माध्यमातुन वैद्यकीय क्षेत्रामध्ये काम करणार्‍या अनेकांना क्रांतीसुर्य प्रतिष्ठानच्यावतीने भरघोस मदत करण्यात येते.

यावेळी डॉ. अनंत मोरे, क्रांतीसुर्य प्रतिष्ठानचे संचालक विनय नेवसे, प्रकाश इनामदार यांची प्रमुख उपस्थिती होती.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!