मातोश्री विकास सेवा सोसायटी भाडळी बुद्रुकची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध

चेअरमनपदी मोहनराव डांगे; व्हा. चेअरमनपदी राजेंद्र माने


दैनिक स्थैर्य | दि. ८ सप्टेंबर २०२४ | फलटण |
मातोश्री विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी मर्या; भाडळी बु., ता. फलटणची २०२३-२४ ते २०२८-२९ या कालावधीसाठी होणारी निवडणूक नुकतीच बिनविरोध पार पाडली.

संस्थेच्या स्थापनेनंतरची ही पहिलीच निवडणूक झाली. यामध्ये संस्थेचे संस्थापक मोहनराव साहेबराव डांगे यांच्यासह दत्तात्रय गुलाबराव डांगे, शिवाजी बाबा डांगे, वसंतराव मनोहर डांगे, तुकाराम साहेबराव डांगे, पांडुरंग सदाशिव मुळीक, धर्मराज बाळासो शिंदे, सर्जेराव दत्तात्रय जाधव, कुंडलिक शिवाजी शेंडे, राजेंद्र पांडुरंग माने, निवास चंदर शिरतोडे, विजया नामदेव डांगे, रिता हरिदास सावंत यांची संचालकपदी बिनविरोध निवड झाली. यावेळी संचालक मंडळातून सर्वानुमते चेअरमनपदी मोहनराव डांगे यांची तर व्हा. चेअरमनपदी राजेंद्र माने यांची निवड करण्यात आली.

यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून एस. टी. गरुडकर यांनी काम पाहिले. त्यांना संस्थेचे सचिव सचिन सोनवलकर यांनी सहकार्य केले.

नवनिर्वाचित चेअरमन, व्हा. चेअरमन तसेच संचालक यांचे विधान परिषद सदस्य श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, आमदार दिपक चव्हाण, श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, जे. पी. गावडे (सहाय्यक निबंधक सहकारी संस्था फलटण), हनुमंतराव सोनवलकर, सचिन रणवरे यांच्यासह ग्रामस्थांनी अभिनंदन केले.


Back to top button
Don`t copy text!