
दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
थेट WhatsApp वर मिळवा
दैनिक स्थैर्य । दि. ०६ ऑक्टोबर २०२१ । सातारा । सातारा येथील परिवर्तनवादी चळवळीतील कार्यकर्ते मिनाज सय्यद यांच्या आई आणि डॉ. राजश्री देशपांडे यांच्या सासुबाई शहाजहान निजाम सय्यद (७८) यांचे आज सकाळी सातारा येथे खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असताना दुःखद निधन झाले आहे. त्यांच्या पार्थिवावर संध्याकाळी सातारा येथील गेंडामाळ कब्रस्तान येथे दफनविधी करण्यात आला.
त्यांचे मागे पती निजाम सय्यद गुरुजी , दोन विवाहित मुले , सुना , विवाहित मुलगी , जावई , नातवंडे असा परिवार आहे . त्यांना बाई म्हणुन ओळखले जायचे. सय्यद यांचे मुळगाव कराड तालुक्यातील येळगाव होते. ज्येष्ठ स्वा. सैनिक कॉ शेख काका हे त्यांचे सख्खे चुलते होत.
धर्म-जाती, सासू-सून अशी सर्व पारंपरिक नाती ओलांडून अस्सल माणुसकीचे नाते प्रस्थापित करणाऱ्या सय्यद कुटुंबाचा खंदा दुवा म्हणजे बाई होत्या.



