दैनिक स्थैर्य | दि. 13 डिसेंबर 2023 | फलटण | आज संसदेमध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी जी मागणी केलेली आहे. त्यामध्ये आपल्या राज्यामध्ये ओबीसी प्रवर्गाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण मिळावे. यासाठी आरक्षणाची जी मर्यादा आहे; ती वाढली पाहिजे. यासोबतच आपल्या राज्यामध्ये असणाऱ्या धनगड व धनगर हा एकच समाज असून धनगर समाज बांधव म्हणजेच धनगड असा उल्लेख विविध दस्तऐवजामध्ये आहेत. याबाबत राज्य सरकारने सुद्धा दोन्ही जाती एकच आहेत; असे स्पष्ट केले आहे. तरी या दोन्ही विषयांच्याबाबत केंद्रीय पातळीवरून बैठकीचे आयोजन करण्यासाठी संसदेमध्ये मागणी केली असून गैरसमज करणाऱ्या लोकांपासून सावध राहावे; असे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या व्हायरल ऑडिओ क्लिप मध्ये उल्लेख आहे.