कितीतरी मुलांना ‘श्रमप्रतिष्ठा’ शिकवणारा पानफूल विक्रेता

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. 14 डिसेंबर 2023 | फलटण | मर्यारापुरुपोत्तम, सत्वशील राजा,श्रीरामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेली फलटणनगरी, दरवर्षी उत्साहात श्री प्रभु श्रीरामचंद्रांचा रथोत्सव म्हणजेच होत असतो. म्हणजेच फलटणची रामयात्रा उत्साहात पार पडते. यंदा दुष्काळाच्या व अवकाळी पावसाझ्या झळा सोसून सुद्धा ग्रामीण भागातील महिला, पुरूप बालचमुनीही उपास्थिती लावली होती.

मी ही निघालो रथाला, फलटणमध्ये पोहोचलो तर अगदी गजबजून गेलेल, खेळणीवाले, पाळणावाले, तसेच महिलांसाठी गृहउपयोगी वस्तुंचा सेल सार काही बघत निघालो. इतक्यात आवाज आला. “पानफुल घ्या; पानफुल” दर्शनाला येणाऱ्या सर्वांना फक्त 5 रुपयात पानफुल देणारी कष्टकरी मंडळी आपले काम चोखपणे करित होती. एवढ्यात एक कोवळा आवाज माझ्या कानावर पडला “साहेब; पानफुल घ्या” मी त्याच्याजवळ गेलो एका खोक्यात त्याने पानफुल ठेवली होती. आणि ते खोक गळ्यात अडकवून तो ओरडत होता “पानफुल घ्या; पानफुल” साधारणतः १० ते १२ वर्षाचा हा विडणी गावचा मुलगा त्याच्याच वयाच्या कितीतरी मुलांना ‘श्रमप्रतिष्ठा’ शिकवित होता.

मला त्याच खुप कौतुक वाटलं किती लहान वय मात्र त्याने केलेल्या कष्टाचा आवाज मात्र सवपिर्यंत पोहोचत होता. त्याच्याच वयाची कितीतरी मुलं आईवडिल रथाला जाण्यासाठी पैसे अजून जास्त द्यावेत म्हणून रडत होती; हट्ट करित होती; हा तो मुलगा मात्र परिस्थितीच्या छाताडावर उभा राहून स्वतःची भाकरी कमवित होता; मी १० रुपये दिले पानफुल घेतले आणि निघालो, परत त्याने आवाज दिला तुमचे पाच रुपये घ्या, पानफुल 5 रुपयाला एक आहे, मी म्हणालो राहु है, असु दे तुला, नको साहेब तुमचे 5 रुपये माझ्या कामाचेच मला पैसे राहू द्या… मी स्तब्ध झालो प्रामाणिकपणाच्या विद्यापीठातून त्या ह्या मुलासारखी कितीतरी थोडी मुलं सापडतात, लबाडीचा पैसा हा महापुरासारखा असतो जितक्या वेगाने येतो तितक्याच वेगाने आयुष्य उध्वस्त करून निघून जातो.

मात्र रामाच्या रथात दिवसभर उन्हात उभं राहून, घसा कोरडा पडेपर्यंत ओरडून कमावलेले 5 रुपयांचं नग मात्र यासारख्या झऱ्याच्या पाण्यासारख, निर्मळ आणि निर्विकार आणि कायम टिकणार असतं. इतक्यात आवाज आला “आपल्या मौल्यवान वस्तु, दागिने, पैसे सांभाळून ठेवा, लहान मुल आठवले आणि विचार करू लागलो ह्या जगात पैशापेक्षा, दागिन्यापेक्षा, मौल्यवान मुलं पैसा कमावताना गाळलेला घाम मौल्यवान वाटला, कारण दागिने, पैसे चोरता येतात पण कष्टाचा घाम आणि मनगटातलं कर्तुत्व चोरी करता येत नाही.

पानफुल विकणाऱ्या सुगंधी रामस्पर्श लाभलेल्या निरागस हातासारखं

– शब्दांकन
नवनाथ महादेव कोलवडकर,
९२८४२१८११४


Back to top button
Don`t copy text!