दैनिक स्थैर्य | दि. २८ ऑक्टोबर २०२३ | फलटण |
मराठा योध्दा मनोज जरांगे पाटील यांचे २५ ऑक्टोबर २०२३ पासून आंतरवली सराटी, ता. अंबड, जि. जालना येथे मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण मिळण्यासाठी उपोषण सुरू आहे. या उपोषणाला पाठिंबा म्हणून फलटण तालुयातील मराठा क्रांती मोर्चा व सकल मराठा समाजाकडून साखळी उपोषण सुरू आहे. या उपोषणास फलटण तालुका मुस्लीम समाज संघटनेने जाहीर पाठिंबा दिला आहे. संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी फलटण येथील साखळी उपोषण स्थळावर जाऊन आपला पाठिंबा दिला आहे.
फलटण तालुका मुस्लीम समाज नेहमीच मराठा समाजाच्या पाठीशी होता, आजही आहे व उद्याही मराठ्यांच्या पाठीशी राहणार आहे, असे संघटनेने यावेळी म्हटले आहे.
पाठिंबा जाहीर करताना मुस्लीम संघटनेचे सिकंदर डांगे, पप्पूभाई शेख, शाकीर महात, आसिफ शेख, शकील शेख, आसिफ मेटकरी, जमशेद पठाण, शोएब शेख, परवेज शेख, दाऊद आतार, इम्तियाज काझी, मुश्ताक नगारजी आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.