अर्जेंटिनाचा महान फुटबॉलपटू मॅराडोनाचे हृदयविकाराने निधन


 

स्थैर्य, दि.२६: टिनाचा महान फुटबॉलपटू दिएगो मॅराडोनाचे बुधवारी वयाच्या ६० व्या वर्षी निधन झाले. रॉयटर्स या वृत्तसंस्थेनुसार, मॅराडोनाला हृदयविकाराचा तीव्र झटका आला होता. २ आठवड्यांपूर्वीच त्याच्यावर मेंदूतील गाठीची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. मॅराडोनाने ३० ऑक्टोबरला आपला ६० वा वाढदिवस साजरा केला होता. चार फिफा विश्वचषकात खेळलेल्या मॅराडोनाने आपल्या नेतृत्वात 1986 मध्ये अर्जेंटिनाला विश्वविजेतेपद मिळवून दिले होते. मेंदूच्या शस्त्रक्रियेनंतर ८ दिवसांत त्याला रुग्णालयात सुटी देण्यात आली होती. यानंतर तो घरीच विश्राम करत होता.

मुंबई 26/11 : मरण जवळून पाहिलं की जगण्यातलं भयही निघून जातं : विश्वास नांगरे पाटील


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!