दैनिक स्थैर्य | दि. ८ जुलै २०२४ | फलटण |
श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा फलटण तालुक्यात दाखल झाला असून आज तरडगाव मुक्कामी असणार आहे. यानिमित्त कोळकी ग्रामपंचायतीच्या वतीने भाविक भक्तांसाठी अनेक सोईसुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने वारकर्यांसाठी पत्र्याचे तात्पुरते यात्री निवासी शेड उभे करण्यात आले आहे, अशी माहिती ग्रामपंचायतीच्या वतीने देण्यात आली आहे.
ग्रामपंचायतीने निवासी शेडबरोबरच मोफत पिण्याचे पाणी भरण्याची सोय टँकरवर केलेली आहे, तसेच दोन ठिकाणी पाणी पिण्यासाठी टँकर उभे करण्यात आलेले आहेत. भाविकांसाठी मदत कक्ष, जंतुनाशक पावडरची फवारणी सुरू असून रस्त्याच्या कडेची साफसफाई फरांडी ट्रॅक्टरद्वारे केलेली आहे. राम रामोशी पोलीस चौकी येथे लाईटची सोय केलेली आहे.
या सर्व सुविधांचा लाभ वारकर्यांनी घ्यावा, असे आवाहन कोळकी ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ. अपर्णा पखाले, उपसरपंच डॉ. अशोक नाळे व ग्रामविकास अधिकारी रमेश साळुंखे यांनी केले आहे.