मनोज (तात्या) गावडे भाजपात; माजी खासदार रणजितसिंह यांच्या उपस्थितीत प्रवेश


दैनिक स्थैर्य | दि. २२ ऑक्टोबर २०२४ | फलटण | फलटण तालुक्यातील पूर्व भागाचे युवा नेते तथा गोखळीचे तंटा मुक्ती अध्यक्ष मनोज (तात्या) गावडे यांनी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे. त्यांनी प्रवेश केल्याने राजे गटाला पुन्हा एकदा धक्का बसला असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.

सुरवडी येथील हॉटेल निसर्ग येथे आयोजित कार्यक्रमात मनोज गावडे यांनी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे. यावेळी जेष्ठ नेते प्रल्हाद साळुंखे – पाटील, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे संचालक माणिकराव सोनवलकर, युवा उद्योजक रणजित शिंदे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.

आगामी काळामध्ये फलटण तालुक्याचा व आमच्या गावाचा, भागाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वात काम करण्यासाठी प्रवेश केला असल्याचे मत यावेळी मनोज (तात्या) गावडे यांनी व्यक्त केले.


Back to top button
Don`t copy text!