मनोज जरांगे पाटील ७ डिसेंबरपासून महाराष्ट्र दौऱ्यावर; प्रत्येक जिल्ह्यात जाऊन साधणार संवाद

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील ७ डिसेंबरपासून राज्यव्यापी दौऱ्यावर जाणार आहेत. चार ते पाच टप्प्यांत होणाऱ्या या दौऱ्यात ते कुणबी प्रमाणपत्रांच्या अडचणी जाणून घेणार आहेत.

स्थैर्य, सातारा, दि. २४ नोव्हेंबर : मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी येत्या ७ डिसेंबरपासून राज्यव्यापी महाराष्ट्र दौऱ्याची घोषणा केली आहे. कुणबी नोंदी आणि जात वैधता प्रमाणपत्र मिळवताना मराठा बांधव व विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणी जाणून घेण्यासाठी ते राज्यातील प्रत्येक जिल्ह्याला भेट देणार आहेत. चार ते पाच टप्प्यांत हा दौरा पूर्ण केला जाणार असून, दौऱ्याचा सविस्तर कार्यक्रम १ डिसेंबर रोजी जाहीर केला जाणार आहे.

प्रत्येक जिल्ह्यात एक दिवस संवाद

राज्य सरकारला मागण्यांच्या पूर्ततेसाठी काही कालावधी दिल्यानंतरही राज्यातील अनेक भागांत मराठा बांधवांना आरक्षण प्रमाणपत्र आणि कुणबी वैधता प्रमाणपत्र मिळवण्यात अडचणी येत आहेत. या पार्श्वभूमीवर जरांगे पाटील यांनी हा दौरा आखला आहे. या दौऱ्यात प्रत्येक जिल्ह्यासाठी एक दिवस राखीव ठेवण्यात येणार असून, तेथे कोणतीही जाहीर सभा किंवा शक्तिप्रदर्शन न करता केवळ समाजाशी थेट संवाद साधला जाणार आहे.

कुणबी नोंदींच्या अडचणी मांडण्याचे आवाहन

ज्या मराठा बांधवांच्या कुणबी नोंदी सापडूनही अद्याप प्रमाणपत्र मिळालेले नाही, किंवा हैदराबाद गॅझेटनुसार प्रमाणपत्र प्रक्रियेत अडथळे येत आहेत, अशा नागरिकांनी दौऱ्यादरम्यान प्रत्यक्ष भेटून आपल्या समस्या मांडाव्यात, असे आवाहन जरांगे पाटील यांनी केले आहे. उपोषण स्थगित केल्यानंतर सरकारला दिलेली मुदत डिसेंबरमध्ये संपत असल्याने त्यांच्या या महाराष्ट्र दौऱ्याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

 

 

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!