भोसे येथे सासन काठीच्या मानकरी युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

दैनिक स्थैर्य । दि. २० एप्रिल २०२२ । सातारा ।  साताऱ्यातील कोरेगाव तालुक्यातील भोसे येथे गावाच्या यात्रेत एक अत्यंत दुर्देवी घटना घडली आहे. ग्रामदेवतेच्या पालखीदरम्यान सासनकाठीला विजेचा धक्का लागल्यानं काठीचा मानकरी असलेल्या युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. 11 के.व्ही क्षमतेच्या वीज वाहिनीचा शॉक लागून काठीचा मानकरी असलेल्या युवकाचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे गावावर शोककळा पसरली आहे.

भोसे गावात मंगळवारी ग्रामदैवत ज्योर्तिलिंग यात्रेत देवाची पालखी आणि मानाची सासनकाठीची ग्रामप्रदक्षिणा होती. सासनकाठीचे मानकरी महेश बाळासाहेब माने हे होते. त्यांनी ही काठी आकर्षकरित्या सजवून त्यावर वीजेच्या माळादेखील लावल्या होत्या.

सकाळी ग्रामप्रदक्षिणेला सुरुवात झाली. त्यावेळी महावितरणच्या ११ के.व्ही. क्षमतेच्या वीजवाहिनीचा काठीला धक्का लागला. वीजप्रवाह काठीत उतरला आणि महेश माने यांचा जागीच मृत्यू झाला. ग्रामस्थांनी त्यांना तातडीनं कोरेगाव उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले.

माने कुटुंबातील महेश हा एकुलता एक मुलगा होता. सैन्य दलातून निवृत्त झालेल्या त्याच्या वडिलांचेही दोन वर्षापूर्वी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले होते. महेश अविवाहीत असून त्यांच्या निधनाने यात्रेचा सगळा उत्साहच मावळला असून या घटनेने संपूर्ण गावाला मोठा धक्का बसला आहे.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!