सातारा पोलिस दलाच्या शिरपेचात मानाचा तुरा; बेस्ट युनिट इन कम्युनिटी पोलिसिंग इनिशिएटीव्हमध्ये ठरले सर्वोत्कृष्ट पोलीस घटक


दैनिक स्थैर्य । दि. १७ सप्टेंबर २०२१ । सातारा । सातारा जिल्हा पोलिस दलाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला असून बेस्ट युनिट इन कम्युनिटी पोलिसिंग इनिशिएटीव्ह या निकषामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वोत्कृष्ट पोलीस घटक म्हणून घोषित झाले आहे.

महाराष्ट्र राज्य पोलिसांची कार्यक्षमता व कामगिरी वाढवणे, दिलेल्या मर्यादेमध्ये उत्कृष्ट पद्धतीने काम करणे, गुन्हेगारीला प्रतिबंध आणि गुन्हयाचा तपास, कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या संबंधीत पोलीस अधिकारी/अंमलदार यांना प्रोत्साहित करणे आदी हेतू साध्य करण्यासाठी पोलीस महासंचालक कार्यालय महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्यामार्फत सर्वोत्कृष्ठ पोलीस घटक पुरस्कार प्रदान करण्याच्या अनुषंगाने मुल्यांकनाचे निकष ठरवले होते. या निकषांची सकारात्मक, नकारात्मक मापदंड (पॅरामिटर्स) इ.च्या अनुषंगाने घटकातील पुर्ण वर्षात (जाने 2020 ते डिसें 2020) दाखल गुन्हयांची माहिती विचारात घेवून वार्षिक गुन्हेगारीच्या आधारावर तंतोतंत श्रेणी तयार न करता तीन श्रेणीमध्ये पुढील प्रमाणे घटकांची विभागणी केली होती.

यामध्ये 1) कॅटेगरी ए – वार्षिक आयपीसी गुन्हे 6000 पेक्षा कमी असलेले जिल्हा आयुक्तालये (2) कॅटेगरी बी – वार्षिक आयपीसी गुन्ह 6000 पक्षा जास्त असलेले जिल्हे आयुक्तालय (3) कॅटेगरी सी – पोलीस आयुक्त बृहन्मुबई यांचे अधिपत्याखालील सर्व घटक अशा श्रेणी बनवल्या. त्यापैकी सातारा जिल्हा पोलिस दलाचा कॅटॅगरी बी या श्रेणीमध्ये समावेश करण्यात आलेला होता.
या अनुषंगाने सन 2020 मधील जिल्हास्तरावर करण्यात आलेल्या कामगिरीची माहिती अप्पर पोलीस महासंचालक, कायदा व सुव्यवस्था, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांना देण्यात आलेली होती. यामध्ये सातारा जिल्ह्यास बेस्ट युनिट इन कम्युनिटी पोलिसिंग इनिशिएटीव्ह कॅटेगरीमध्ये प्रथम नामांकन प्राप्त झाले आहे. या कॅटेगरीचे निवड प्रक्रियेकरीता मुल्यांकन समिती तयार करण्यात आलेली होती. ज्यामध्ये अप्पर पोलीस महासंचालक, कायदा व सुव्यवस्था, म. रा. मुंबई हे अध्यक्ष होते व विशेष पोलीस महानिरीक्षक, राज्य गुन्हे अन्वेषण केंद्र, महाराष्ट्र राज्य पुणे. पोलीस उप महानिरीक्षक, कोकण परिक्षेत्र, नवी मुंबई, पोलीस अधीक्षक जळगाव व पोलीस अधीक्षक कोल्हापुर या सदस्यांनी काम पाहिले होते. या कॅटेगरीमध्ये केलेल्या कामाचे मुल्यांकन करून संबंधित समितीने सातारा जिल्हयास सर्वोत्कृष्ठ पोलीस घटक म्हणुन घोषित केले आहे.

पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल, तत्कालिन अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे किशोर धुमाळ, पो. नि. अशोक मदने, सपोनि अनिता मेणकर, उपनिरीक्षक गणेश वाघ, हवालदार शकुंतला कोरडे, पो. ना. हणमंत भोसले, पोना विक्रांत फडतरे, समाधान राक्षे, अर्चना पावणे यांनी कामकाज पाहिले होते. डॉ . श्री . विक्रांत देशमुख, डॉ. अंबाजी राजमाने, डॉ. ऋतुराज देशमुख, डॉ. प्रवीण पाटील व डॉ. वैभव शिंदे व त्यांची सर्व मेडीकल टिम यांचे मोलाचे योगदान प्राप्त झाले आहे. वाचक शाखेकडील सपोनि बाचक स्वप्निल घोंगडे, पोउपनिरीक्षक अशिष जाधव, पोहवा अरविंद काकडे, संजय टिळेकर, मपोना जयश्री कदम, पोको सागर कदम, विजय माने यांनी कामकाज पाहिले होते.

या कार्याची घेतली दखल
🔹 सैनिकांच्या नातेवाईकांना आलेल्या अडचणी व प्रकरणे हे सोडविण्याकरीता सलग 3 महिने तक्रार निवारण दिन घेतलेे. यामध्ये एकुण 238 प्रकरणे प्राप्त झाली व त्याची निर्गतीही करण्यात आली.

🔹 कोव्हीडने बाधीत पोलीस अंमलदारांना व त्यांचे नातेवाईक यांचे करीता चैतन्य पोलीस ऑक्सीजन हॉस्पीटल उभारण्यात आले होते. यामध्ये 4 इंटीलेटर बेड, 1 एचएफएनओ बेड, 31 ऑक्सिजन बेड, ईसीजी मशीन, पोर्टेबल एक्स-रे मशीन, मॉनीटर, कार्डीअ‍ॅक अ‍ॅम्बुलन्स इत्यादी सुविधा उपलब्ध करुन दिलेल्या होत्या. या हॉस्पीटलकरीता डॉक्टरर्स, नर्स, ब्रदर्स वगैरे असे एकुण 36 लोकांनी यशस्वीरित्या कामगिरी बजावली होती. चैतन्य कोव्हीड सेंटरमध्ये एकुण 123 अंमलदार यांनी औषधोपचार घेतले होते.

🔹 अलंकार हॉल सातारा येथे कोव्हीड-19 बाधित असलेले परंतु इतर कोणतेही लक्षणे नसलेल्या पोलीस अमलदार यांचे करीता 75 बेडची सुविधा उपलब्ध करण्यात आलेली होती. एकुण 173 लोकांना औषधोपचार देण्यात आले होते.

🔹 कोव्हीड -19 च्या कालावधीत पारधी समाजातील लोकांसाठी धान्य व जीवनावश्यक वस्तुंचे वाटप करण्यात आले होते. सातारा शहर, फलटण, माण-खटाव, कराड या भागातील पारधी लोकांना धान्य व जीवनावश्यक साहित्य पुरवण्यात आले होते. कातकरी समाज, राजस्थानी व इतर गरीब लोकांना अन्न व धान्य पुरवण्यात आले होते.

🔹 निर्भया पथकाचे माध्यमातून महिला व मुलीना सेल्फ डिफेंन्सची प्रशिक्षण देण्यात आले होते . महिलांसाठी एस.टी. स्टॅन्डवर मदत केंद्र कार्यान्वित करण्यात आली आहेत. विविध क्षेत्रामध्ये कर्तव्य बजावणार्‍या महिला व शाळा व कॉलेजमध्ये जाणार्‍या मुलींकरीता महिला दिनाचे आयोजन करण्यात आले होते.अशा प्रकारचे विविध उपक्रम राबविण्यात आले होते.


Back to top button
Don`t copy text!