
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
दैनिक स्थैर्य । दि.२१ जानेवारी २०२२ । सातारा । राष्ट्रीय मतदार दिवसानिमित्त जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक कार्यालय सातारा तसेच मतदार नोंदणी अधिकारी 262 सातारा विधानसभा मतदारसंघ यांच्या सयुंक्त विद्यमाने साताऱ्यात मंगळवार दि.25 जानेवारी 2022 रोजी सकाळी 11 वा. यशवंतराव चव्हाण महाविद्यालय सातारा येथे राष्ट्रीय मतदार दिनाचे आयोजन करण्यात आले आहे.
हा कार्यक्रम जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी शेखर सिंह यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे. अशी माहिती उपजिल्हाधिकारी तथा उपजिल्हा निवडणूक अधिकारी निता सावंत-शिंदे व 262 सातारा विधानसभा मतदार संघाचे मतदार नोंदणी अधिकारी मिनाज मुल्ला यांनी दिली.
