वीर या नावाला साजेसा पतसंस्थेचा कारभार : मदन भोसले


स्थैर्य, भुईंज, दि.८ : देशभक्त आबाबासाहेब वीर यांनी स्वातंत्र्य चळवळीत आणि सुराज्य निर्मितीत जे योगदान दिले त्याला तोड नाही. त्यामुळे त्यांच्या नावाने काम करत असलेल्या संस्थेचा आदर्शवत कारभार कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन किसन वीर उद्योग समूहाचे अध्यक्ष मदन भोसले यांनी भुईंज येथे केले.

देशभक्त आबासाहेब वीर सहकारी पतसंस्थेच्या ठेव योजना शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. यावेळी संस्थेच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष विलासभाऊ जाधवराव म्हणाले, आजपर्यंत सर्वसामान्य लोकांना डोळ्यासमोर ठेऊन कारभार केला आहे. मदनदादांनी ज्या उद्देशाने ही संस्था स्थापन केली त्याला यत्किंचितही तडा जाऊ दिला नाही, की आबांच्या नावाला कमीपणा येईल असे एकही वर्तन घडले नाही. या वाटचालीत सर्व सभासद, ग्रामस्थ, संचालक, अधिकारी, कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

यावेळी उपाध्यक्ष उत्तमराव भोसले, संचालक वसंत वारागडे, विठ्ठल कुचेकर, बळवंत जाधव, मदन निकम, सचिव संजय शिंदे, माजी सरपंच अर्जुन भोसले, अरुण वालेकर, शेखर भोसले पाटील, उपसरपंच प्रशांत जाधवराव, ईशान भोसले, संजय भोसले, जितेंद्र वारागडे, नंदकुमार भोसले, आनंद जाधवराव, सयाजी दगडे, संजय जाधव आदी उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!