
मलठण येथील श्री सिद्धिविनायक मंदिर परिसरातील कंपाउंड वॉल व रिटेनिंग वॉल काँक्रेटीकरणाच्या कामाचे आमदार सचिन पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले.
स्थैर्य, फलटण, दि. १४ सप्टेंबर : मलठण येथील श्री सिद्धिविनायक मंदिर परिसरातील कंपाउंड वॉल आणि रिटेनिंग वॉल काँक्रेटीकरणाच्या कामाचे भूमिपूजन आमदार सचिन पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि जिजामाला रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला.
सिद्धिविनायक मंदिर परिसरातील कामाचा शुभारंभ
मंदिर परिसरातील कंपाउंड वॉल आणि रिटेनिंग वॉलच्या काँक्रेटीकरणाचे काम या माध्यमातून हाती घेण्यात आले आहे. इंदिराराजे रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि ताराराजे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या हस्ते नारळ फोडून प्रत्यक्ष कामाचा शुभारंभ करण्यात आला.
ग्रामस्थांची मोठी उपस्थिती
भूमिपूजनप्रसंगी नगरसेवक अशोकराव जाधव, युवा नेते रणजितसिंह भोसले यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.