योग जीवनाचा अविभाज्य घटक बनवा – शिवेंद्रसिंहराजे


दैनिक स्थैर्य । दि. 22 जुन 2025 । सातारा । योगाला पूर्वापार चालत आलेली आपली मोठी परंपरा आहे. योगामुळे आरोग्य चांगले राहून मनशांती मिळते. प्रत्येकाने योगासने रोज करुन आपल्या जीवनात योगाला अविभाज्य घटक बनवा, असे आवाहन सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले.

मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हा प्रशासन, जिल्हा क्रीडा अधिकारी व आयुष विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने येथील श्रीमंत छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुलात योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी ते
बोलत होते.

सुरुवातीला मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याहस्ते दिपप्रज्वलन करुन योग दिनास प्रारंभ करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी संतोष पाटील, प्रांताधिकारी आशिष बारकुल, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. युवराज करपे, जिल्हा क्रीडा अधिकारी नितीन तारळक आदी उपस्थित होते.

रोज योगासने केल्यामुळे मनशांती बरोबर आरोग्यही चांगले राहते. हजारो वर्षांपासून परंपरा या योगाला आहे. योगासनांमुळे अनेक व्याधी बर्‍या होत आहेत. रोज योगासने करुन आपले जीवन योगामय करा, असे आवाहन करुन सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या.

योगामुळे प्रकृती चांगली राहते. आरोग्यदायी जीवनासाठी रोज योगासने केली पाहिजेत. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त संपूर्ण जिल्ह्यात विविध ठिकाणी योग दिनाचे आयोजन करण्यात आले असल्याचे जिल्हाधिकारी श्री. पाटील यांनी यावेळी सांगितले. योगदिना निमित्त आयोजित कार्यक्रमात विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून योग प्रात्यक्षिक केली.


Back to top button
Don`t copy text!