स्थैर्य, औरंगाबाद, दि. २६: वाळूज औदयोगिक परिसरातील ग्राम पंचायत औरंगाबाद महापालिकेत समावेश करण्याच्या हालचाली चुकीच्या आहे. या परिसराचा विकास करण्याससाठी शासनाने एकदा पाहणी करून स्वतंत्र महापालिका करून विकास करावा. यापूर्वी अनेक ग्रामपंचायत औरंगाबाद महापालिकेत समाविष्ट करण्यात आलेल्या आहे. त्यांचा अद्याप विकास झालेला दिसत नाही. त्यामुळे वाळूज परिसराचा महापालिकेत समावेश करू नये. असे केल्यास कृतीसमिती तयार करून शेवट पर्यंत विरोध करणार असल्याचे सरपंच सचिन गरड यांनी बजाजनगर परिसरात पत्रकार सांगितले.
यावेळी वाळूजच्या सरपंच सईदा पठाण यांनी महापालिकेत समाविष्ट करण्याला विरोध असल्याचे सांगितले. पंढरपूरचे माजी सरपंच शेख अक्तर यांनी सांगितले की, गावाचा विकास करायचा असेल तर महापालिकेत समावेश करू नये. असे केल्यास आंदोलन करावे लागेल.
तिसगावचे उपसरपंच नागेश कुठारे यांनी सांगितले की, शासनाने याचा पुनर्विचार करावा, ग्रामीण भागाच्या विकाससाठी ग्रामपंचायत महत्त्वाची आहे त्यामुळे वाळूज ला महापालिकेत घेऊ नये.
यावेळी श्रीकांतराव नवले, संजय जाधव, पाटोदा चे उपसरपंच कपेंद्र पेरे, वळदगाव चे उपसरपंच संजय झळके महेबूब चौधरी आदींनी मनोगत व्यक्त करत महापालिकेत समावेशाला विरोध केला.
वडगाव को सरपंच सचिन गरड, वाळूजच्या सरपंच सईदा पठाण, गोलवाडीचे सरपंच बाबासाहेब धोंडरे, माजी जि. प सदस्य रामचंद्र कसुरे, वळदगावचे माजी सरपंच श्रीकांतराव नवले, माजी उपसरपंच महेंद्र खोतकर, महेबूब चौधरी, ग्रामपंचायत सदस्य कैलास हिवाळे, राजेश कसुरे, गणेश बिरंगळ, संजय जाधव, रोहित राऊत, आदींसह नागरिक पत्रकार परिषदेत उपस्थित होते.