साखरवाडी शिक्षण संस्थेची उज्वल परंपरा कायम राखा : जेष्ठ नेते प्रल्हाद साळुंखे – पाटील

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. 09 जानेवारी 2024 | साखरवाडी | साखरवाडी शिक्षण संस्थेच्या सर्व विभागातील विद्यार्थ्यांनी शासकीय स्पर्धा परीक्षा, क्रीडा, कला, शिष्यवृत्ती या परीक्षेत उज्वज यश मिळविले हीच परंपरा कायम राखण्यासाठी त्यांना भरीव सहकार्य करणार अशी ग्वाही विश्वस्त समिती अध्यक्ष प्रल्हादराव साळुंखे पाटील यांनी बक्षिस वितरण समारंभात दिली.

साखरवाडी शिक्षण संस्थेचे बालक, प्राथमिक, माध्यमिक व तांत्रिक विभागाचे ७८ वे स्नेहसंमेलन व बक्षिस वितरण समारंभात मार्गदर्शन करताना प्रल्हादराव साळुंखे पाटील बोलत होते. यावेळी संस्थेचे अध्यक्ष धनंजय साळुंखे पाटील, संचालक राजेंद्र भोसले, राजेंद्र शेवाळे, कौशल भोसले तसेच माजी शिक्षिका सौ. श्रध्दा वाळिंबे माजी विद्यार्थींनी व सांगली जिल्हा कृषी उपसंचालक प्रियांका भोसले व माजी विद्यार्थी संदिप भोंडे यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती.

प्रारंभी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. शालेय विद्यार्थींनीनी उत्कृष्ट ईशस्तवन व स्वागतगीत सादर केले. यावेळी प्रमुख मान्यवरांचा सत्कार धनंजय साळुंखे पाटील व सचिव सौ. उर्मिला जगदाळे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी मान्यवरांच्या हस्ते प्रकाश सांवत्सरिक व हस्तलिखितांचे प्रकाशन करण्यात आले.

यावेळी बोलताना सौ. श्रध्दा वाळिंबे यांनी सांगितले की, या शाळेची परपंरा मोठी आहे. या शाळेत काही वर्षे सेवा केली त्याचा अनुभव पुढील काळात मिळाला. विद्यार्थ्यांनी आत्मविश्वास व चिकाटीने अभ्यास करा यश तुमचेच आहे असे सांगितले.

माजी विद्यार्थी व राष्ट्रीय स्तरावर खो-खो खेळलेली माजी विद्यार्थिंनी प्रियांका भोसले यांनी सांगितले की, माझा प्रवास खडतर झाला. परंतू या शाळेने दिलेले विचार व खेळातील यश या जोरावर मी उच्च पदावर पोहचले याचा मला अभिमान आहे.  माजी विद्यार्थी संदिप भोंडे यांनी ही विद्यार्थ्यांना लहानपणाचे संस्कार महत्वाचे असतात त्याच जोरावर तुम्ही उत्कृष्ट नागरिक बना असे आवाहन केले.

यावेळी शालांत परीक्षा मार्च २०२३ परीक्षा, शिष्यवृत्ती, विविध स्पर्धेतील गुणवंत विद्यार्थ्यांना रोख पारितोषिके देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच शाळेतील गुणवंत व उपक्रमशिल शिक्षक हरिदास सावंत, सौ. आशा यादव, सौ. रेश्मा कर्वे, व सौ. सुरेखा कुचेकर, सौ. ज्योती साळुंखे, नितीन शिंदे यांना गौरवण्यात आले. आदर्श लेखनिक म्हणून सौ. बिंदू सस्ते यांना सन्मानित करण्यात आले. दुपारी करमणूकीचे कार्यक्रमात ६५० विद्यार्थांनी भाग घेवून मनोरंजनाचा सर्वोत्तम कार्यक्रम पार पडला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हरिदास सावंत यांनी केले तर आभार पर्यवेक्षक तुळशीदास बागडे यांनी मानले. या समारंभास संरपच सौ. रेखा जाधव, माजी मुख्याध्यापक प्रल्हाद बोंद्रे, संपत चांगण तसेच बाळासाहेब कुचेकर, सुरेश भोसले तसेच परिसरातील पालक, शिक्षक, विद्यार्थी व निमंत्रित मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!