महिला शेतकरी प्रमाणपत्र वितरणात आचारसंहितेचा अडथळा; अर्जदारांची चिंता वाढली

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

महिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी राज्यभरातून लाखो अर्ज दाखल झाले असले तरी निवडणुकांच्या आचारसंहितेमुळे वितरण प्रक्रियेत तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या आहेत.

स्थैर्य, सातारा, दि. ०८ ऑक्टोबर : शेती क्षेत्रातील महिलांच्या योगदानाला अधिकृत मान्यता देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या ‘महिला शेतकरी प्रमाणपत्र’ मोहिमेला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. ७ ऑक्टोबरपर्यंत तब्बल ३७ लाख ९३ हजार ५१ अर्ज प्राप्त झाले आहेत. मात्र, आगामी स्थानिक स्वराज्य संस्था व इतर निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर लागू झालेल्या आचारसंहितेमुळे या प्रमाणपत्रांच्या प्रत्यक्ष वितरणात तांत्रिक व प्रशासकीय अडथळे निर्माण झाले आहेत.

सेवा संकल्प अभियानात कृषी विभाग आघाडीवर

राज्य शासनाच्या सेवा संकल्प अभियानाअंतर्गत कृषी विभागाने महिला शेतकरी नोंदणीसाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे. इतर सर्व शासकीय विभागांच्या तुलनेत कृषी विभागात सर्वाधिक नोंदणी झाली असून महिला शेतकऱ्यांनी या उपक्रमाला मोठा प्रतिसाद दिला आहे. शेतात प्रत्यक्ष काम करणाऱ्या महिलांना शासकीय योजना, कृषी कर्ज, विमा आणि इतर सवलतींचा लाभ सुलभतेने मिळावा, हा या प्रमाणपत्राचा मुख्य उद्देश आहे.

ग्रामसभा आणि विशेष बैठकांवर परिणाम

महिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी प्राप्त अर्जांची पडताळणी ग्रामसभा किंवा नगरपंचायतींच्या विशेष बैठकांमध्ये करून ठराव मंजूर करणे बंधनकारक आहे. परंतु, आचारसंहिता लागू झाल्यामुळे शासकीय पातळीवर अशा बैठकांचे आयोजन आणि प्रमाणपत्रांचे अधिकृत वितरण थांबले आहे. यामुळे अर्जांची पडताळणी पूर्ण झाली तरी अंतिम प्रमाणपत्र मिळण्यासाठी महिला शेतकऱ्यांना आचारसंहिता संपण्याची वाट पहावी लागणार आहे.

 

 

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!