प्रजासत्ताक दिन सोहळ्यात महाराष्ट्राच्या चित्ररथाला परवानगी नाकारलेली नाही – सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे स्पष्टीकरण

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

दैनिक स्थैर्य । दि.१७ जानेवारी २०२२ । मुंबई ।  प्रजासत्ताक दिनी नवी दिल्ली येथे होणाऱ्या संचलनात महाराष्ट्र राज्याच्या चित्ररथाला परवानगी नाकारलेली नसल्याचे स्पष्टीकरण सांस्कृतिक कार्य संचालनालयाने केले आहे.

प्रजासत्ताक दिनी नवी दिल्ली येथे होत असलेल्या संचलनात महाराष्ट्र राज्याने सादर केलेल्या विविध विषयांमधून या वर्षी ‘महाराष्ट्राची जैवविविधता व मानके‘ या विषयाची केंद्र शासनाकडून निवड करण्यात आली आहे. याबाबत वेळोवेळी संरक्षण मंत्रालयाच्या सूचनेनुसार बैठका आयोजित होऊन महाराष्ट्र राज्याच्या चित्ररथाची एकूण 12 राज्यांसमवेत निवड अंतिम करण्यात आलेली आहे. सद्यस्थितीत राष्ट्रीय रंगशाळा, नवी दिल्ली येथे संरक्षण मंत्रालयाच्या देखरेखीखाली चित्ररथाची बांधणी सुरु असून हे काम अंतिम टप्प्यात आहे. महाराष्ट्राच्या चित्ररथाला परवानगी नाकारल्याबाबत कोणतीही सूचना संरक्षण मंत्रालयाकडून प्राप्त झालेली नाही. असे स्पष्टीकरण सांस्कृतिक कार्य संचालनालयाने केले आहे.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!