मुधोजी महाविद्यालयात महाराष्ट्र राज्य क्रीडा दिन उत्साहात

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

दैनिक स्थैर्य | दि. १७ जानेवारी २०२५ | फलटण |
फलटण एज्युकेशन सोसायटी, फलटण संचलित मुधोजी महाविद्यालय, फलटण येथे बुधवार दिनांक १५ जानेवारी २०२५ रोजी पै. खाशाबा जाधव यांचा जन्मदिवस ‘महाराष्ट्र राज्य क्रीडा दिन’ म्हणून उत्साहात साजरा करण्यात आला.

याप्रसंगी प्रा.डॉ.स्वप्निल पाटील यांनी पै. खाशाबा जाधव यांचा संपूर्ण जीवन परिचय उपस्थितांना करून दिला.

प्राचार्य डॉ.पी.एच. कदम महाविद्यालयातील शैक्षणिक वर्षातील राष्ट्रीय, विद्यापीठ, राज्य खेळाडूंचा सत्कार केला व महाराष्ट्र राज्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

या कार्यक्रमाचे नियोजन आणि सूत्रसंचालन शारीरिक शिक्षण संचालक प्रा.डॉ. स्वप्निल पाटील यांनी केले व प्रा. संकेत पाटील यांनी आभार मानले.

यावेळी महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व सेवक वर्ग उपस्थित होते.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!