दुष्काळी अनुदानासाठी ७ कागदपत्रे अनिवार्य; लगेच करा जुळवाजुळव, मदतीचा मार्ग मोकळा

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

राज्य सरकारने २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर केल्यानंतर पंचनामे सुरू झाले असून अनुदान आणि भरपाई मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना ७ महत्त्वाची कागदपत्रे तयार ठेवावी लागणार आहेत.

स्थैर्य, सातारा, दि. ०५ ऑक्टोबर : राज्यातील सुमारे २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आल्यानंतर आता महसूल व कृषी विभागाकडून नुकसानीचे पंचनामे वेगाने सुरू आहेत. पंचनाम्यांचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर बाधित शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट मदत जमा केली जाणार आहे. या पार्श्वभूमीवर शासनाकडून मिळणारे आर्थिक अनुदान आणि नुकसान भरपाई विनाविलंब मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी ७ महत्त्वाची कागदपत्रे वेळेत तयार ठेवणे आवश्यक आहे. कागदपत्रांच्या अभावी मदतीपासून वंचित राहावे लागू नये यासाठी महासेवा केंद्र आणि सेतू कार्यालयांमध्ये शेतकऱ्यांची धावपळ सुरू आहे.

ही ७ महत्त्वाची कागदपत्रे ठेवा तयार

दुष्काळी मदतीचा लाभ मिळवण्यासाठी शेतकऱ्यांकडे आधार कार्ड, अद्ययावत सातबारा आणि ८-अ उतारा, बँक पासबुकची प्रत, मोबाईल ॲपद्वारे केलेली ई-पीक पाहणी नोंदणी, शेतकरी नोंदणी क्रमांक (फार्मर आयडी), पंचनामा अहवाल प्रत आणि बँकेची केवायसी (KYC) प्रक्रिया पूर्ण असणे बंधनकारक आहे. सर्व प्रक्रिया ऑनलाइन आणि डीबीटी (DBT) प्रणालीद्वारे होणार असल्याने आधार कार्ड बँकेशी जोडलेले असणे अत्यंत गरजेचे आहे.

पंचनामे अंतिम टप्प्यात; थेट खात्यावर जमा होणार रक्कम

सध्या कृषी आणि महसूल विभागाचे अधिकारी प्रत्यक्ष शेतात जाऊन पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करत आहेत. अहवाल शासनाला सादर झाल्यानंतर थेट लाभ हस्तांतरण योजनेनुसार पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अनुदानाची रक्कम वर्ग केली जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी ऐनवेळी होणारी धावपळ टाळण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून ठेवावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

 

 

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!