आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्यात उद्या ‘महाराष्ट्र दिन’

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २५ नोव्हेंबर २०२१ । नवी दिल्ली । महाराष्ट्राची लोककला ही समृद्ध अशी आहे. उद्या दि.26 नोव्हेंबर रोजी आंतरराष्ट्रीय व्यापार मेळ्यात ‘महाराष्ट्र दिन’ साजरा केला जाणार आहे. येथील प्रगती मैदानावर 40 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्यात ‘महाराष्ट्र दिना’चे उद्घाटन अपर मुख्य सचिव तथा निवासी आयुक्त (महाराष्ट्र सदन) शामलाल गोयल यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून केंद्रीय माहिती प्रसारण विभागाचे सचिव अपुर्व चंद्र हे असणार आहेत.

पिनॅक इव्हेंट्स ॲण्ड मॅनेजमेंट या संस्थेच्यावतीने ‘महाराष्ट्राची लोककला’ हा सांस्कृतिक कार्यक्रम मेळाव्यातील  एम्फी  थिएटर (हॉल क्रमांक 2 ते 5 जवळ)  येथे सांयकाळी 5:30 वाजता  होणार आहे.

भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्यात सहभागी देश व राज्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण होते. या अंतर्गत व्यापार मेळाव्याच्या बाराव्या दिवशी शुक्रवारी ‘महाराष्ट्र दिन’ साजरा करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात गणेश वंदना, भुपाळी, ओवी, भारूड, गोंधळ, गण, गवळण, पोवाडा, शाहिरी, लावणी,  कोळी गीत, जागरण, जोगवा असे लोककलेचे विविध प्रकार सादर केले जाणार आहे. विशेष म्हणजे या कार्यक्रमात गायक स्वत: गायन करतील आणि त्यावर कलाकार त्यांची-त्यांची कला सादर करतील.

या सांस्कृतिक कार्यक्रमास येथील दिल्लीकरांनी अधिकाधिक  प्रतिसाद  द्यावा, असे आवाहन महाराष्ट्र लघुउद्योग विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक प्रवीण दराडे यांनी केले आहे.


Back to top button
Don`t copy text!