महादेव खंडेराव यादव |
स्थैर्य, फलटण, दि.२१ : नाईक निंबाळकर देवस्थाने चॅरिटेबल ट्रस्ट व अन्य चॅरिटेबल ट्रस्टचे व्यवस्थापक महादेव खंडेराव यादव वय ७१ यांचे हृदयविकाराच्या तिव्र धक्क्याने निधन झाले. अस्थिरोग तज्ञ डॉ. चंद्रशेखर यादव यांचे ते वडिल तर डॉ. बी. के. यादव यांचे ते बंधू होते.
गेल्या ४३ वर्षांपासुन ते फलटणच्या राजघराण्याच्या सेवेत होते. फलटण संस्थानचे अधिपती श्रीमंत मालोजीराजे नाईक निंबाळकर यांचे त्यांनी १९७३ साली स्वीय सहाय्यक म्हणून काम पाहिले होते. त्या काळात त्यांचा तत्कालीन पंतप्रधान मोरारजी देसाई, राज्यपाल गणपतराव तपासे, माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण आदींसह अन्य राजकीय, शैक्षणिक, सामाजिक, वैद्यकीय क्षेत्रातील विविध माण्यवरांशी त्यांचा जवळून संबंध आला. श्रीमंत मालोजीराजे नाईक निंबाळकर, बापूसाहेब महाराज, श्रीमंत शिवाजीराजे व विधान परिषद सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी त्यांच्या कार्यकाळात ट्रस्टचे कामकाज पाहिले.
महाराष्ट्र राज्य खो खो असोसिएशनचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांना श्रध्दांजली वाहिली. त्यांच्या पश्चात दोन मुले व एक मुलगी असा परिवार आहे.