
श्रीराम कारखान्याचे माजी संचालक मधुकर माळवे यांनी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या उपस्थितीत शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
स्थैर्य, फलटण, दि. २६ जून : श्रीराम सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक व सातारा जिल्हा परिषदेचे माजी सदस्य मधुकर भानुदास माळवे यांनी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला आहे.
मधुकर माळवे हे फलटण तालुक्याच्या पूर्व भागातील एक ज्येष्ठ व अनुभवी नेतृत्व म्हणून ओळखले जातात. त्यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपचा झेंडा हाती घेतला आहे. माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून त्यांनी हा महत्त्वपूर्ण राजकीय निर्णय घेतला.
माळवे यांच्यासोबतच विविध सामाजिक आणि राजकीय क्षेत्रांतील कार्यकर्त्यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला. यामध्ये लहुजी शक्ती सेनेचे उपाध्यक्ष संदीप रवींद्र आवळे, सामाजिक कार्यकर्ते शंकर रणदिवे, युवा कार्यकर्ते मोहन घोरपडे आणि प्रशांत भंडलकर यांचा प्रामुख्याने समावेश आहे.
या सर्व पदाधिकाऱ्यांनी आपल्या समर्थकांसह पक्षात प्रवेश केल्याने पूर्व भागात भाजपची ताकद वाढली आहे.