दैनिक स्थैर्य | दि. ५ मार्च २०२४ | फलटण |
मागील दोन दिवसात फलटण तालुक्यातील चौधरवाडी येथील शेतकरी योगेश नाळे यांच्या विहिरीतून दोन (Indian Spectacled Cobra) भारतीय नाग जातीचे साप तसेच मांडवखडक येथील अमित बनकर यांच्या विहिरीतून (Russells Viper) घोणस जातीचा साप सुखरूपपणे पकडून “Nature And Wildlife Welfare Society, Phaltan” या संस्थेचे सदस्य अभिजीत जाधव, श्रीनिवास भुजबळ, शुभम फडके, गणेश शिंदे, पंकज पखाले, मनोज पखाले, धीरज भोसले, बोधीसागर निकाळजे यांनी त्यांना निसर्गात मुक्त केले.
यावेळी नागरिकांना संस्थेतर्फे आवाहन करण्यात आले की, सर्व शेतकरी वर्गाने आपल्या विहिरीचे बांधकाम पक्के करावे, जेणेकरुन अशा दुर्घटना घडू नयेत. तसेच जर असे वन्यजीव विहिरीमध्ये पडलेले आढळले तर संस्थेला किंवा वनविभागाला संपर्क करावा.
Contact –
Nature & Wildlife welfare society, phaltan
Mo. – 7588532023