फेसबुक इंस्टाग्राम सुरु; काही तास होते बंद


दैनिक स्थैर्य | दि. ०५ मार्च २०२४ | फलटण | गेल्या काही तासांपासून संपूर्ण भारतामध्ये अचानक पणे फेसबुक व इंस्टाग्रामच्या वापर करताना काही अडचणी येऊ लागल्या होत्या. त्यामध्ये फेसबुक खात्यामधून अचानकपणे लॉग आउट झाल्याची सूचना सर्वत्र गेली. त्यानंतर पुन्हा लॉगिन करताना सर्वांनाच अडीअडचणी येत होत्या. पुन्हा लॉगिन काही होतच नव्हते. सुमारे दोन तासानंतर फेसबुक व इंस्टाग्रामची सुविधा पुन्हा सुरू झाली आहे. आता फेसबुकला लॉगिन करून पुन्हा वापरकर्त्यांना फेसबुक व इंस्टाग्राम वापरता येत आहे.


Back to top button
Don`t copy text!