लाईफलाईन हॉस्पिटलच्या डॉ. सौ. मेघना बर्वे यांचा केमिस्ट अ‍ॅण्ड ड्रगिस्ट असोसिएशनकडून सत्कार

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. ८ मे २०२३ | फलटण |
लाईफ लाईन हॉस्पिटल फलटणच्या डॉ. सौ. मेघना बर्वे यांचा सत्कार फलटण तालुका केमिस्ट अ‍ॅण्ड ड्रगिस्ट असोसिएशनचे ज्येष्ठ सभासद श्री. विजय जाधव, माजी उपाध्यक्ष श्री. मिलिंद म्हेत्रे यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी ज्येष्ठ सभासद आशिष शेठ, संघटक सचिव श्रीकृष्ण सातव, कार्यकारणी सदस्य श्री. सुजित भोईटे, सभासद अथर्व शेठ, धीरज शेठ, शेखर शेठ व लाईफ लाईन मेडिकल स्टाफ व अध्यक्ष संग्रामसिंह धुमाळ उपस्थित होते.

विधान परिषदेचे माजी सभापती व विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे यांच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित ‘बोन डेन्सिटी कॅम्प’ यास खूपच चांगला प्रतिसाद मिळाला. या शिबिरामध्ये ज्येष्ठ नागरिक व महिला यांचा सहभाग जास्त होता. या सर्वांना हाडांमध्ये असलेल्या कॅलशिअमचे प्रमाण व हाडे ठिसूळ का बनतात, याचे चांगले मार्गदर्शन मिळाले. या शिबिराबद्दल नागरिकांमधून समाधान व्यक्त केले गेले.


Back to top button
Don`t copy text!