डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त कोळकी येथे श्रामणेर व बौद्धाचार्य प्रशिक्षण शिबिर संपन्न

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. ८ मे २०२३ | फलटण |
भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटणच्या वतीने २७ एप्रिल ते ६ मे २०२३ या कालावधीमध्ये कोळकी, ता. फलटण येथे श्रामणेर शिबिर व बौद्धाचार्य प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिरास प्रमुख मार्गदर्शक म्हणून भंते धम्मरक्षितजी महाथेरो उपस्थित होते. यावेळी संपूर्ण तालुक्यासह आजूबाजूच्या इतरही गावांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंतीनिमित्त व धम्मदेसनेसाठी श्रामणेर संघाने माण, खटाव, खंडाळा, जेऊर तसेच पिंप्रद, मिरगाव, निंभोरे या गावांसह तालुक्यातील इतरही गावांमध्ये चरिका करून धम्म देसना दिली. यावेळी श्रामणेर होण्यासाठी मुंबई, सातारा, उंब्रज या ठिकाणाहून उपासक आले होते.

यावेळी संघाला भोजनदान सिद्धार्थ नवतरुण मंडळ, दालवडी, आयु. लोंढे परिवार, मिरढे, सिद्धार्थ तरुण मंडळ, वाखरी, भिमजयंती उत्सव मंडळ, सरडे, भिमजयंती उत्सव समिती, सोनगांव बं., डॉ. बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती महोत्सव समिती, पिंपरद, आयु. हरिष काकडे (आप्पा) मंगळवार पेठ, फलटण, संघमित्र तरुण मंडळ, बौद्धनगर, विडणी, आयु. प्रा.डॉ.प्रभाकर पवार सर यांनी दिले. तर सिद्धार्थ तरुण मंडळ, निरगुडी, आयु. सचिन अहिवळे, माजी नगरसेवक, फलटण नगरपरिषद, आयु. रामचंद्र जगन्नाथ मोरे भारतीय बौद्ध महासभा, फलटण (संस्कार), आयु. राहुल भालेराव सर केंद्रीय शिक्षक, भारतीय बौद्ध महासभा, आयु. बजरंग गायकवाड, भारतीय बौद्ध महासभा, फलटण (संघटक), आयु. सिकंदर आढाव फौजी कलेक्शन, कोळकी, आयुनि. स्वाती परमेश्वर कांबळे, आयु. सोमाशेठ जाधव, मा.नगरसेवक, फलटण नगरपरिषद, आयु. राजकुमार रणवरे साहेब, जिंती केंद्रप्रमुख यांनी संघास अल्पोपहार दिला.

फलाहाराची व्यवस्था भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण, भिमज्योती तरुण मित्र मंडळ, आदर्शनगर, दातेवस्ती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती महोत्सव समिती, पिंपरद, आयु. बाबासाहेब जगताप भारतीय बौद्ध महासभा, फलटण (संस्कार), भिमजयंती उत्सव मंडळ, राजाळे, आयु. विश्वास मोरे, दुधेबावी, आयु. डॉ. रमेश भोसले, बिजवडी, आयु. सचिन दशरथ मोहिते, समतानगर भारतीय बौद्ध महासभा, फलटण (संघटक), आयुनि. ज्योत्स्ना रमेश जगताप सरपंच, ग्रा.पं.सोनगांव, आयुब सुभाष मनोहर बनसोडे, झडकबाईचीवाडी यांनी दिला.

भोजनदानावेळी प्राध्यापक प्रभाकर पवार यांनी बोधी वृक्षाचा रोक्त सर्व श्रामणेरांना दिले. तर सहाय्यक उपआयुक्त आयकर विभाग तुषार मोहिते यांनी सर्व श्रामणेरांना ‘बुध्द आणि त्यांचा धम्म’ हे डॉ.बाबासाहेब आंबेडकर लिखित पुस्तक व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार असणारे पुस्तक भेट दिले.

हे शिबिर यशस्वी करण्यासाठी फलटण तालुका भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष आयु. महावीर भालेराव, आयु. बाबासाहेब जगताप सचिव (संस्कार), आयु. विठ्ठल निकाळजे सर उपाध्यक्ष (संस्कार), केशव ठोंबरे, संपत भोसले, अर्जुन ननावरे, परमेश्वर कांबळे, आयु. चंद्रकांत मोहिते, संघटक, विलास कांबळे, सचिन मोहिते, संजय घोरपडे, अमोल काकडे, बजरंग गायकवाड, शांताराम मोहिते, राजू मोरे, राजकुमार गायकवाड, आयु. जयसिंग घाडगे कोषाध्यक्ष, बी. एस. भोसले तालुका सचिव यांनी विशेष मेहनत घेतली.

शिला काकडे, रोहन कांबळे, रामचंद्र मोरे, अमोल भोसले, संग्रह कांबळे, बापूराव निकाळजे, सातारा जिल्हा भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष श्रीमंतराव घोरपडे, सातारा जिल्हा सरचिटणीस आयु. अविनाश बारसिंग सर, केंद्रीय समता सैनिक दलाचे असिस्टंट स्टाफ ऑफिसर तथा केंद्रीय शिक्षक, बौद्धाचार्य आयु. दादासाहेब भोसले, केंद्रीय शिक्षक अरुण गायकवाड, खंडाळा तालुक्याचे अध्यक्ष यशवंत खुंटे (आप्पा), केंद्रीय शिक्षक तथा सातारा जिल्हा शाखा पूर्व विभाग संस्कार उपाध्यक्ष आयु. नानासो मोहिते सर, केंद्रीय शिक्षिका कुसुमताई घोरपडे, करुणा मोहिते, सुजाता गायकवाड, अमर खरात, अविनाश जगताप, बाळासो जाधव, नंदकुमार शिंदे, अरुण रणदिवे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.


Back to top button
Don`t copy text!