दैनिक स्थैर्य | दि. 04 एप्रिल 2024 | फलटण | तालुक्यातील मुंजवडी येथील विहरीत नाग पडला असल्याची माहिती नेचर अँड वाईल्डलाईफ वेल्फेअर सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांना कळवण्यात आली होती. त्यानंतर नेचर अँड वाईल्डलाईफ वेल्फेअर सोसायटी पदाधिकाऱ्यांनी विहरीमध्ये पडलेल्या नाग म्हणजेच कोब्राला जीवदान देण्यात आले आहे.
फलटण शहरासह तालुक्यात कोणत्याही ठिकाणी साप, नाग किंवा अन्य वन प्राणी नागरिकांना रहिवासी भागामध्ये आढळून आले तर त्यांनी नेचर अँड वाईल्डलाईफ वेल्फेअर सोसायटीशी (मोबा.: 7588532023) संपर्क साधावा; असे आवाहन करण्यात आले आहे.