इंदापूर येथील सभेसाठी फलटण तालुक्याची ताकद दाखवू – गिरीश बनकर

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. ५ डिसेंबर २०२३ | फलटण |
सध्या सुरू असलेल्या आरक्षण विषयक प्रश्नावर समोरच्या बाजूने सभांवर सभा घेतल्या जात आहेत. त्यात संविधानिक पध्द्तीने मागणी न करता फक्त ओबीसी नेते व विषेशतः ना. छगन भुजबळ यांच्यावर खालच्या पातळीत टीका केली जात आहे. ओबीसी आरक्षणावर बोलणार्‍या ना. भुजबळ साहेबांना ताकद देण्यासाठी फलटण तालुक्यातून मोठ्या संख्येने ओबीसी बांधव जाणार आहेत. या सभेसाठी आपण सर्वजण महिला व तरुण मोठ्या संख्येने उपस्थित रहा, असे आवाहन ओबीसी संघर्ष समितीचे युवा कार्यकर्ते व आरक्षण अभ्यासक गिरीश बनकर यांनी विठ्ठलवाडी, ता. फलटण येथे बैठकीदरम्यान केले.

ओबीसी आरक्षण संघर्ष समितीच्या बैठका गावोगावी सुरू आहेत. त्यातील काल रात्री झालेल्या विठ्ठलवाडी, शिंदेंमळा, तरडगाव येथील बैठकींना ओबीसी बांधवांचा उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी समाज बांधवांना ओबीसी आरक्षणाची आकडेवारी सासवड ग्रामपंचायत सदस्य अमोल रासकर यांनी समजून सांगितली, तर समता परिषदेचे तालुकाध्यक्ष बापूराव शिंदे यांनी सभेला जाण्यासाठी केलेले नियोजन सांगितले. या सभेसाठी सर्वांनी घराला कुलूप लावून मोठ्या संख्येने उपस्थित रहा, असे आवाहन यावेळी त्यांनी केले.

यावेळी संघर्ष समितीचे विजयदादा शिंदे, कोळकीचे उपसरपंच वैभव नाळे, सासवड ग्रामपंचयतीचे सदस्य किरण जाधव, रणजित भुजबळ, माधव जमदाडे, शरद कोल्हे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले व सभेसाठी पूर्ण ताकदीने उपस्थित राहण्याचे आवाहन केले.

सनी रायकर यांनी उपस्थितांचे आभार मानले.


Back to top button
Don`t copy text!