स्थैर्य, सातारा, दि.१९: त्रिशंकू भागातील समस्या सोडवण्यासाठी आपण नेहमीच प्रयत्न केले आहेत. सातारा पालिकेची हद्दवाढ झाली असून हा भाग आता पालिका हद्दीत आला आहे. या भागातील सर्व समस्या सोडवून त्रिशंकू भागाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी प्राधान्य देऊ, अशी ग्वाही आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिली.
गोडोली येथील पालवी चौक ते गोळीबार मैदान डोंगर पायथ्याकडे जाणाऱ्या रस्त्यासाठी आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या विशेष प्रयत्नातून २५ लाख रुपये निधी मंजूर झाला असून या रस्त्याचे भूमिपून आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. यावेळी पंचायत समिती सदस्य आशुतोष चव्हाण, नगरसेवक शेखर मोरे पाटील,पंचायत समितीचे माजी सदस्य दादा जाधव, विलासपूरचे उपसरपंच अभय जगताप, ज्येष्ठ नेते व्यंकटराव मोरे, कांतीलाल कांबळे, युवराज जाधव, रवी पवार, फिरोज पठाण, संजय चव्हाण, मोहन घाडगे, प्रकाश घाडगे, विनोद डावरे, आनंदराव कदम, पांडुरंग पोतेकर, शहाजी जाधव, पंत चव्हाण, मेजर भोसले, देशमाने साहेब, विनायक कोळी, साहेबराव जाधव, निकमसर, डॉ. खाडे, कारंडेसर, मेजर देशमुख , धनेश खुडे, बुवा सूर्यवंशी, रामभाऊ सुतार, गणेश निकम, श्रीकांत जाधव, विशाल सूर्यवंशी यांच्यासह गोळीबार मैदान मधील ज्येष्ठ नागरिक व गोळीबार मैदान मित्र समूहाचे सदस्य उपस्थित होते. त्रिशंकू भाग पालिका अथवा ग्रामपंचायत हद्दीत येत नसल्याने या भागाच्या समस्या सोडवण्यासाठी अनेक अडचणी येत होत्या. अशाही परिस्थितीत या भागातील रस्ते व इतर कामे मार्गी लावण्यासाठी विविध योजनांचा निधी खेचून आणला आहे. या रस्त्याच्या कामासाठीही निधी उपलब्ध करून दिला आहे. आपण सर्वजण कार्यकर्ते या भागातील समस्या सोडवण्यासाठी नेहमीच सक्रिय असता. या भागाचा समावेश आता पालिका हद्दीत झाला आहे. आगामी काळात या भागातील सर्व समस्या सोडवू आणि हा संपूर्ण भाग विकासाच्या प्रवाहात आणू, असा शब्द आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी यावेळी दिला.